Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेमका काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजारोहणात? जाणून घ्या फरक.

नेमका काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजारोहणात? जाणून घ्या फरक.
 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते. या वर्षी भारत १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. सर्व भारतीयांनी देश स्वतंत्र झाला याबाबत जल्लोष साजरा केला सर्वत्र आनंदी वातावरण साजरे केले जात होते.

भारतात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन विशेष दिवशी ध्वजारोहण केले जाते. कारण २६ जानेवारी १९५० रोजी भारत देशाची राज्यघटना लागू करण्यात आली होती. परंतु या दोन्ही दिवशी केल्या जाणाऱ्या ध्वजारोहणात फरक आहे. या दोन विशेष दिवसातील फरक जाणून घेऊयात.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (Independence Day)आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (Republic Day )हे दोन्ही दिवस भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात आणि या दोन्ही दिवसांचे तितकेच खास ऐतिहासिक महत्व आहे. महत्वाचा फरक म्हणजे १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज खालून दोरीने वर खेचला जातो, नंतर तो उघडला जातो आणि फडकवला जातो, याला ध्वजारोहण (Flag Hoisting) असे म्हणतात. हे १५ ऑगस्ट १९४७ च्या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करण्यासाठी केले जाते. घटनेत याला ध्वजारोहण असे म्हणतात. त्याचवेळी २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज शीर्षस्थानी बांधलेला असतो, जो उघडला जातो आणि नंतर फडकवला जातो. २६ जानेवारीच्या ध्वजारोहणाला 'ध्वजांकित' (Flagged)म्हणतात.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान  ध्वजारोहण करतात आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी संविधानप्रमुख राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना  लागू करण्यात आली होती तर घटनात्मक प्रमुख या उद्देशाने राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतात. कारण पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात. या कारणांमुळे १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २६ जानेवारीला राष्ट्रपती राष्ट्रध्वज ध्वजांकित करतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.