' कुणबी मराठ्यापासून सावध राहा कारण...', प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर दुसरीकडे मात्र ओबीसीकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध होत आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कुणबी मराठ्यापासून सावध राहावं असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आंबेडकर?
'कुणबी मराठ्यांपासून सावध राहावं, त्याचं कारण विधिमंडळ सभागृहात 190 इतकी कुणबी मराठा आमदारांची संख्या आहे तर ओबसीचे फक्त 11 आमदार आहेत. हे कुणबी मराठा आमदार स्वत:ला ओबीसी मानतात पण ते सभागृहामध्ये ओबसीच्या बाजुने नाही तर मराठा समाजाच्या बाजुनं उभे आहेत. ते सोनार, बजांरा समाज, धनगर, अशा कुठल्याच ओबीसीची बाजू घेणार नाहीत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका आहे,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते यवतमाळच्या पूसद येथे बोलत होते.दरम्यान पुढे बोलताना आंबेडकर यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात एसी, एसटीसाठी 57 आरक्षित जागा आहेत. मराठा ओबीसी विभाजन होऊन ते एकमेकांना मतदान करणार नाहीत. ओबीसींना आपलं आरक्षण वाचवायचं आहे, तर मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे, म्हणून एसी, एसटीच्या 57 जागा महत्वाच्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.