धक्कादायक! गर्भवती शेळीवर सामूहिक बलात्कार, सर्वत्र संतापाची लाट
बिहारमध्ये तीन तरुणांनी असे कृत्य केले ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या तिघांनी गर्भवती शेळीवर सामूहिक बलात्कार केला. शेळीचा आरडाओरडा ग्रामस्थांनी ऐकताच ते त्या ठिकाणी पोहोचले. लोकांना पाहताच दोन्ही तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर एकाला गावकऱ्यांनी पकडले. घटना वैशाली जिल्ह्यातील आहे. घटना घडत असताना शेळीच्या आवाज ऐकून लोक तेथे जमा झाले होते. मात्र, यादरम्यान दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे अटक आरोपींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारांनी कदम चौकाजवळ एका शेळीवर सामूहिक बलात्कार केला. लोकांनी अटक आरोपींना खुर्चीला बांधले होते. या आरोपीने आपले नाव सोनू कुमार असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार सोनूने सांगितले की, त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ताडी प्यायली होती आणि नंतर नशेत त्यांनी ही अत्यंत घृणास्पद घटना घडवली. गोंधळानंतर त्याचे दोन साथीदार पळून गेले. सोनूने त्याच्या एका मित्राचे नाव अविनाश सांगितले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी एका आरोपीला पकडल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी सोनूला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.