आजवर आपण पैसे, दागिने, मोबाईल चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. परंतु,चीनमधील एका गावात भलताच प्रकार घडला आहे. याठिकाणी चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीतून 400 मृतदेह चोरल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. चीनमध्ये स्मशानभूमीतून मृतदेह चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांन पर्दाफाश केला. या टोळीने 4000 हून अधिक मृतदेहांची तस्करी केली होती. या मृतदेहांची अवयवांसाठी तस्करी असून चिनी एजन्सींनी या प्रकरणात 75 जणांना गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या शांक्सी प्रांताचे पोलीस सध्या अशा प्रकरणाचा तपास करत आहेत. स्मशानभूमी आणि वैद्यकीय प्रयोगशाळेतून मृत लोकांचे मृतदेह चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीची पोलिसांना माहिती मिळाली आहे. हे मृतदेह शांक्सी ऑस्टेरॉइड बायोमेडिकल आणि हेंगपू टेक्नॉलॉजी नावाच्या कंपन्यांना विकले गेले.
मृतदेह विकण्याची ही प्रक्रिया 2015-23 दरम्यान सुरू झाली असून यातून टोळीने किमान ₹75 कोटी कमावले. चीनच्या सात राज्यात हा व्यवसाय सुरू होता आणि येथून मृतदेहांची तस्करी केली जात होती. तस्करी केलेल्या मृतदेहांची हाडे बाहेर काढून त्यांची विटंबना करण्यात येत होती. या प्रकरणात ज्या 75 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्मशान व्यवस्थापन अधिकारी, डॉक्टर आणि कंपनीचे अधिकारी यांचा समावेश आहे. या अहवालानंतर चीनमधील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. काही काळ टीव्हीवर दाखविल्यानंतर हा अहवाल काढून टाकण्यात आला.
असे म्हटले जाते की, या मृतदेहांच्या हाडांचा उपयोग ज्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि ज्यांच्या हाडांमध्ये खोल जखमा होत्या त्यांच्यावर उपचार केले जात होते. यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या हाडातून टिश्यू घेऊन त्यावर उपचार करण्यात येत होते. साधारणपणे अवयवदात्याची परवानगी घेतली जाते. मात्र या प्रकरणात मृतदेहांच्या हाडांशी छेडछाड करण्यात आली. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीने शुल्क आकारले होते, मात्र त्यानंतरही हा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. अनेक घटनांमध्ये ज्या मृतदेहांची राख कुटुंबीयांना सोबत घ्यायची नव्हती अशा मृतदेहांसोबत असे घडले. हक्क नसलेले मृतदेहही विकले गेले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.