मंदिराच्या पूजऱ्याच्या घरावर पोलीसांचां छापा, 3 पोती उघडताच पोलीसांना आली चक्कर
लखनऊ : आजवर तुम्ही बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकल्याच्या बातम्या ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या असाल. आता एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या पुजाऱ्याच्या घरात 3 पोती सापडल्यात. त्यात असं काही होतं की पोलिसांनाही चक्कर आली.
उत्तर
प्रदेशातील मथुरा येथील हे प्रकरण आहे मुकुट मुखारविंद मंदिरचा पुजारी
दिनेश चंद्र हा 29 जुलै रोजी गायब झाला होता. हे वृत्त मंदिर
प्रशासनापर्यंत पोहोचताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर कोणताही विलंब न लावता
मंदिराच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं.
पुजाऱ्याच्या घरावर छापा
पोलिसांनी पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकला. तिथं 3 पोती होती. पोलिसांनी ही पोती उघडून पाहिली. पोत्यामध्ये असं काही होतं की पोलीसही हादरले.
पोत्यात काय होतं?
त्या पोत्यामध्ये पैसे होते. इतके पैसे की रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा नोटा मोजण्याच्या 2 मशीन मागवाव्या लागल्या. पुजाऱ्याच्या पत्नीच्या उपस्थितीत बँक शाखा व्यवस्थापक आणि बँक कर्मचाऱ्यांनी नोटा मोजल्या. याला काही तास लागले. 3 पोत्यांमध्ये एकूण 72 लाख रुपये होते. जे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची व्हिडीओग्राफीही करून घेतली आहे.
पुजार्याकडे इतके पैसे आले कुठून?
हे पैसे मंदिरातील दानाचे पैसे होते. मंदिरातून 1 कोटी 9 लाख 37 हजार 200 रुपयांची देणगी घेऊन पुजारी बेपत्ता झाला होता. तो पैसे घेऊन ना बँकेत पोहोचला ना परत आला. मंदिराच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी गोवर्धन पोलीस ठाण्यात पुजाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.