Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणानों, व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय 20 लाखांपर्यंतचे कर्ज, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

तरुणानों, व्यवसाय सुरु करण्यासाठी  सरकार देतंय 20 लाखांपर्यंतचे कर्ज, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज 

 
सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. देशातील नागरिकांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जातात.यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकार स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी तरुणांना कर्ज देते.


ज्या तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे. त्या तरुणांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत तरुणांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळते. परंतु आता कर्जाची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे. मात्र, यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे.
तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योदनेअंतर्गत सरकारद्वारे तरुणांना ५०,००० ते १ लाख रुपयांचे लोन दिले जाते. आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनेत आता तुम्हाला २० लाख रुपयांचे लोनदेखील मिळू शकते. परंतु यासाठी ज्या तरुणांनी आधी लोन घेतले आहे आणि पूर्णपणे फेडले आहे त्यांनाच पुन्हा २० लाख रुपयांचे लोन मिळू शकते. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती.

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी भरावी लागत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला कर्जावर १० ते १२ टक्के व्याज द्यावे लागते.
या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा मूळचा भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे. ज्या व्यक्तींना बँकेद्वारे डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, वोटर आयडी, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, व्यवसाय संबंधित सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.