2 कोटींची लाच मागून 75 लाख रुपये घेणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांसह 3 जणं जाळ्यात
मुंबई :-इमारतीवरील दोन अवैध बांधकामावर कारवाई करु नये, यासाठी २ कोटी रुपयांची लाच मागून त्यापैकी ७५ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले. महापालिका अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंदार अशोक तारी (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महापालिका, अंधेरी पूर्व), मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा (वय ३३, प्रॉपर्टी इस्टेट एजंट), प्रतिक विजय पिसे (वय ३५, कंत्राटदार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.यातील फिर्यादी यांची मुंबईतील शहीद भगतसिंग कॉलनीमध्ये स्वत:च्या मालकीची चार मजली इमारत आहे. या इमारतीवरील दोन मजले अवैध असून त्यांच्यावर कारवाई न करणे तसेच नियोजित प्लॉट क्रमांक १९३, १९४ खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी सर्व मिळून २ कोटी रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ३१ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. मंदार तारी याने २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ७५ लाख रुपये स्वीकारण्यास मान्य केले. त्याप्रमाणे तात्काळ सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. मंदार तारी यांच्या सांगण्यावरुन मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा व प्रतिक विजय पिसे हे पैसे घेण्यासाठी आले. तक्रारदार यांच्याकडून ७५ लाख रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले. मंदार तारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया नटे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले हे तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.