दौंड तालुक्यतील खामगाव येथे भरचौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्याने सपासप वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. बहिणीच्या पतीनेच भावाची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. बहिणींना घरी आणले म्हणून दाजीने मेव्हण्याला संपवले. अमोल बहिरट असे आरोपीचे नाव असून सूरज भुजबळ हा या घटनेत मयत झाला आहे. चौकातील दुकानात घुसून आरोपी अमोल बहिरटने कोयत्याने 15 ते 16 वार करत ही हत्या केली. हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.
आठवड्यात समाजमन भयभीत करणाऱ्या घटना
मागील आठवडाभरात राज्यात एकाहून एक धक्कादायक गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. उरण येथे यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची दाऊद शेख नामक आरोपीने क्रूरपणे हत्या केली. त्याच्या आधी शहापूरमध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करुन तिला संपवलं. शुक्रवारी नाशिकमध्ये भरदिवसा दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीवर रॉडने वार करत त्याची हत्या केली. या सर्व घटना लागोपाठ घडल्याने समाजमन भयभीत झालं आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देत आहे. काही ठिकाणी तर पोलिसांवरच हल्ले झाल्याने आता सामान्य लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न विचारला जात आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भिती उरली नसल्याचे हे चित्र आहे. ह्या गुन्हेगारीला चाप लावण्याचं मोठं आव्हान सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.