Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वायनाडमध्ये या कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू

वायनाडमध्ये या कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू
 

कलथींगल नौशीबाचे नशीब तिच्यावर इतके रुसले असे तिला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. वायनाड येथील भूस्खलनात तिचे अख्खे कुटुंब हिरावल्या गेले. तिचे माहेर आणि सासर दोन्ही निसर्गाने हिरावून घेतले. या घटनेत नौशीबाच्या कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू झाला. केरळमधील वायनाड भूस्खलनाचे रौद्ररुप उभ्या जगाने पाहिले. माळिणनंतर देशातील ही मोठी घटना होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 344 जण दगावल्याचे समोर आले आहे.

तिच्यावर नशीबचं रुसलं

वायनाडमधील मेपाडी येथील कलथींगल नौशीबा या वडील, आई, मोठा भाऊ, दोन नणंद, सहा पुतणे-पुतण्या यांच्यासह राहत होत्या. मुंडक्काई येथे त्यांचे जुने घर होते. या भूस्खलनात रात्रीच ते नष्ट झाले. इतकेच कमी होते की काय, नौसाबाचे सासरकडील मंडळी सुद्धा या संकटाने हिरावून घेतली. तिची सासू, दोन भावजया आणि त्यांची दोन मुलं पण काळाने झडप घालून हिरावली. 40 वर्षीय नौशबा सध्या मेप्पडी येथील आरोग्य केंद्रात आश्रयाला आहे. तिथे तिच्या डोळ्यातील अश्रुंना खंड पडलेला नाही.

रोज सकाळी उठून जो गाळ बाहेर काढण्यात येतो, त्यात आप्तांच्या, नातेवाईकांचे मृतदेह शोधण्याचे काम तिला करावे लागत आहे. चोरमाला आणि मेप्पाडी या ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु आहे. बचाव कार्य सुरु आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिथले स्वयंसेवक तो पुरुषाचा की महिलाचे, लहान मुला-मुलींचा याची घोषणा करतात. मृतदेहावरील कपड्यांचे वर्णन करतात. नौशिबा आवाजाच्या दिशेने धावत जाते. पण तिची ही धाव गेल्या तीन दिवसांपासून व्यर्थ जात आहे. तिच्या कुटुंबातील अजून काही सदस्यांचे मृतदेह अजून सापडलेले नाही. पण निदान शेवटचा विधी तरी पार पाडता येईल या आशेने ती दुसऱ्या दिवशी पुन्हा या ठिकाणी धाव घेते.

चोरांचा सुळसुळाट मुंडक्काई येथील मशि‍दीसमोरचं तिच्या वडिलांचे घर होते. या परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वांनी तिच्या वडिलांच्या जुन्या घरात आश्रय घेतला होता. तिचा भाऊ हा सुद्धा कुटुंबकबिल्यासह आला होता. तिचे वडील, आई आणि दोन पुतणींचा मृतदेह सापडले आहेत.तर या भागात चोरांचा पण सुळसुळाट वाढला आहे. गाडल्या गेलेल्या भागात काही किंमती ऐवज हाती लागण्याची आस धरुन भूरटे चोरांनी या भागात मदत कार्याच्या बहाण्याने ऐवज लुटल्याचा आरोप करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.