काँग्रेसच्या सुनील केदार यांची आमदारकी रद्द, NDCC बँक घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. खालच्या कोर्टात हस्तक्षेप करण्यास नकार देत शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाच्या या आदेशामुळे केदार यांच्या आगामी निवडणुका लढवण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदारकी रद्द
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा तसेच साडे बारा लाख रुपयांचा दंड ठोटावण्यात आला होता. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी राज्यघटनेच्या कलम 191 (1) व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 83 (3) अन्वये सुनील केदार यांना आमदार म्हणून अपात्र ठरविले होते. त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती. बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात केली होती. त्यात ही दिलासा न मिळाल्याने आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.