Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LIC मध्ये नोकरी आणि कॉम्प्युटर हाताळता येण्याची अट :, 35 हजाराहून अधिक पगार मिळेल

LIC मध्ये नोकरी आणि कॉम्प्युटर हाताळता येण्याची अट :, 35 हजाराहून अधिक पगार मिळेल 
 

एलआयसी ही देशातील नागरिकांचा विश्वास असलेली संस्था आहे. एलआयसीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे एलआयसीचा आवाका देशभरात पसरलाय. येथे तुम्ही कधी ना कधी नक्कीच गुंतवणूक केली असेल. पण तुम्हाला येथे नोकरीची संधी मिळाली तर? जीवन वीमा निगममध्ये नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांसाठी नामी संधी चालून आली आहे. येथील भरतीसाठी कॉम्प्युटर हाताळता येणे ही महत्वाची अट आहे.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध राज्यांमध्ये ज्यूनिअर असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

पात्रता

एलआयसी एचएफल अंतर्गत ज्युनिअर असिस्टंटच्या एकूण 200 हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 53 जागा या महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे इतके आहे. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर सिस्टिम हाताळता येणे आवश्यक आहे. 

अर्ज शुल्क

एलआयसी एचएफएल भरती 2024 मध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 800 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. सोबत 18 टक्के जीएसटी रक्कमही भरावी लागेल.सर्व उमेदवारांना हे शुल्क भरावे लागेल. यात कोणाला सवलत नसेल. तसेच एकदा भरलेली अर्जाची रक्कम कोणत्याही कारणास्तवर परत केली जाणार नाही, याची नोंद घ्या. 

पगार

ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षा, मुलाखत या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट lichousing.com वर जाऊन आपला अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.