डेंग्यू हा डासांमुळे होणारा एक गंभीर आजार आहे जो काही प्रमाणात प्राणघातक सुद्धा ठरू शकतो. हा आजार प्रामुख्याने पावसाळ्यात आपले डोके वर काढतो. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या दिवसात डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे फार गरजेचे आहे.
जर तुम्हाला डेंग्यू झालाच असेल तर यातून लवकरात लवकर बरे होण्याबाबत काही गोष्टी तुम्हाला ठाऊक असणे गरजेचे आहे. नुकतेच एका डॉक्टरांनी डेंग्यू झाल्यास काय करावे आणि काय करू नाय याबाबत माहिती दिली आहे.
हायड्रेट राहावे: भरपूर पाणी, फळांचा रस, नारळाचे पाणी आणि ओरल ट्रीटमेंट्सच्या मदतीने चांगले हायड्रेटेड राहावे. जेणेकरून तुम्ही डिहायड्रेशन टाळू शकता.
आराम करा: डेंग्यूपासून त्वरीत बरे होण्यासाठी शक्य तितकी विश्रांती घ्यावी. यामुळे तुमचे शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल.
निरोगी आहार: लवकर बरे होण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. यासाठी फळे, भाज्या आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केले पाहिजे.
नियमित तपास करा: तुमच्या शरीरातील इम्प्रोवमेंटवर लक्षकेंद्रित करा. तसेच या काळात तुमची प्लेटलेटची संख्या नियमितपणे तपासत राहा.
जंक फूड टाळावे: जड, मसालेदार किंवा तेलकट अन्नपदार्थांपासून दूर राहा, कारण यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.
लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू: पोटदुखी, सतत उलट्या होणे, रक्तस्त्राव होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे गंभीर आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
हेवी फिजिकल एक्सरसाइज टाळा: कठीण किंवा कठोर व्यायाम टाळा. यामुळे तुमच्या शरीरावर ताण येऊ शकतो आणि तुमच्या रिकव्हरीमुळे मध्ये अडथळा येऊ शकतो.
स्वतः च्या मर्जीनुसार औषधं घेऊ नका: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. विशेषत: अँटिबायोटिक्स किंवा ओव्हर-द-काउंटर औषधे टाळा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.