सांगली : सांगली शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. सागर धनाजी लोखंडे (वय ३४, रा. संपत चौक, सांगली), राज दऱ्याप्पा यादव (वय २४, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. १८ जुलै रोजी शहरातील शांतिनिकेतन महाविद्यालय परिसरातून विजय देसाई (रा. संभाजीनगर, जयसिंगपूर) यांची दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली होती. याप्रकरणी त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सांगली एलसीबीचे पथक चोरट्यांच्या शोधात होते.
त्यावेळी शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात दोघेजण एका मोपेडजवळ बोलत थांबलेले पथकाला दिसले. पथकाला त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ती मोपेड शांतिनिकेतनच्या पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून मोपेड जप्त करण्यात आली. दोघांनाही संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपरनिरीक्षक कुमार पाटील, हणमंत लोहार, अमर नरळे, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.