Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण? मंत्री म्हणतात ' बिबट्या '

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण? मंत्री म्हणतात ' बिबट्या '
 

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण? याचे उत्तर शालेय विद्यार्थी देखील देतील मात्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रि‍पदावर असलेल्या मंत्र्याला आपला राष्ट्रीय प्राणीच माहीत नसल्याचे दिसते आहे. या मंत्र्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मंत्री राष्ट्रीय प्राणी म्हणून चक्क बिबट्याचा उल्लेख करताना दिसतात. संभाजीनगरचे पालकमंत्री, अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचे म्हटले आहे.

बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम वन विभागाचे अधिकारी करत आहेत, असे सत्तार म्हणाले. संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. शहरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत.

शहरात दिसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी 6 पथकं, 100 कर्मचारी, एक गनमॅन दोन आठवड्यापासून बिबट्याचा शोधात आहेत. पालकमंत्री सत्तार यांनी बिबट्याला तीन दिवसात पकडण्याचे आदेश दिलेत. तसेच लवकरात लवकर बिबट्याला जंगलात सोडण्यात येईल, जेणेकरून तो सुरक्षित राहील, असे देखील म्हटले आहे.

शहराला दररोज पाणी मिळणार

संभाजीनगर शहराला दररोज कमीत कमी तीन तास पिण्याचे पाणी मिळायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर याप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी पुढील 90 दिवसांत खारीचा वाटा उचलून संभाजीनगरची पाणी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.