धक्कादायक! बहिणीच्या डोळ्यातलं पाणी, मेव्हण्यानं नवऱ्यासोबत केलं भयंकर कृत्य
आपल्या बहिणीचा पती तिला त्रास देतो, म्हणून एका व्यक्तीने त्याची हत्या केली. तेवढ्यावरच तो थांबला नाही, तर टर्पेंटाइन तेल वापरून त्याने त्याचा मृतदेह जाळून टाकला. गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली. गुरुग्राम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी (22 जुलै) याबद्दल माहिती दिली.
राजेश असं 21 वर्षीय आरोपीचं नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातल्या छत्तरपूरचा आहे. त्याला रविवारी रात्री, 21 जुलैला अटक करण्यात आली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे एसएचओ अरविंद कुमार यांनी सांगितलं, की आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी केली जात आहे.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीचा पती गोरेलाल उर्फ हल्ला (वय 32) त्याच्या पत्नीला (म्हणजे आरोपीच्या बहिणीला) त्रास द्यायचा. एवढंच नव्हे, तर तिच्यावरच्या उपचारांसाठी पैसेही द्यायचा नाही. गोरेलालदेखील मूळचा मध्य प्रदेशातल्या छत्तरपूरचा आहे. तो गुरुग्राममध्ये गवंडीकाम करायचा. गुरुवारी राजेश गोरेलालला सेक्टर 15मधल्या बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत घेऊन गेला. त्या इमारतीत गोरेलाल चौकीदार म्हणून काम करायचा. ते दोघं एकत्र बसून दारू पीत होते. गोरेलाल नशेत असताना राजेशने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने गोरेलालच्या मृतदेहावर टर्पेंटाइन तेल ओतलं आणि मृतदेहाला आग लावली. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.
पोलिसांनी सांगितलं, की सेक्टर 15मधल्या एका नवनिर्मित घराच्या गॅलरीत 19 जुलै रोजी सकाळी जळलेला एक मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी राजेशला शोधून काढलं आणि अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आपल्या बहिणीला तिचा पती त्रास देत असल्यामुळे त्याच्याविषयी आरोपीच्या मनात टोकाचा द्वेष निर्माण झाला. त्यातूनच ही घटना घडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.