नवी मुंबई: तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात का? नोकरीच्या शोधात असाल आणि तेही सरकारी तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण भारतीय पोस्ट खात्याने या खात्यामध्ये काही जागांसाठी भरती काढली आहे. राज्यातील नवी मुंबईच्या वाशी पोस्ट विभागाच्या अंतर्गत ही भरती होणार आहे.
51 रिक्तपदे भरली जाणार:
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर,नवीमुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील 51 रिक्त पदे भरली जाणार असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी केली आहे. त्यामुळे ही जाहिरात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी फायद्याची ठरू शकते. त्यामुळे तुम्ही अथवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कुणी सरकारी नोकरीच्या शोधात असतील ही बातमी त्वरीत त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
असा करा अर्ज:
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आपले अर्ज अधिक माहितीसाठी नियम व अटी पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन https://indiapostgdsonline.gov.in अर्ज भरण्याची शेवटची दि.05 ऑगस्ट 2024 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन करावेत. उमेदवारांचे इतर कोणत्याही मांध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनेनुसार शुल्क फी भरावे लागेल. वरील प्रक्रिया तुम्हाला तात्काळ फॉलो करावी लागणार आहे.
पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. सबंधित प्राधिकरणाद्वारेचे सदर उमेदवारांशी,पत्रव्यवहार जर असेल तर केला जातो. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती/ नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत किंवा कोणत्याही अनैतिक फोन कॉल्सपासून सावध रहावे असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यामुळे आपण इच्छुक असाल तर त्वरीत अर्ज करावा, आणि आलेल्या या संधीचा फायदा घ्यावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.