Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा : बंदुकीचा धाक दाखवून वाईमध्ये सोन्याची लूट

सातारा : बंदुकीचा धाक दाखवून वाईमध्ये सोन्याची लूट
 

दागिने बनविणाऱ्या दोन दुकानांवर दरोडा वाई : येथील धर्मपुरीतील साेन्याचे दागिने बनविणार्‍या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दराेडा टाकण्यात आला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साेन्याचे दागिने बनविणार्‍या दोन दुकानांमध्ये बंदूक व काेयत्याचा धाक दाखवून दुकानातील साेने लुटुन नेले.

धर्मपुरी येथील विष्णू मंदिराच्या पाठीमागील बाजूस साेन्याचे दागिने बनविण्याचे काम करणारे कारागिर आहेत. हे कारागिर वाईतील ज्वेलर्स व्यापार्‍यांकडून साेने घेऊन दागिने बनवून देतात. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दाेन व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी विष्णू मंदिराच्या बाहेर गाडी (एमएच ०९- १९३७) लावून ते चालत गेले.

विष्णू मंदिराच्या मागील बाजूस असणार्‍या एका दुकानात ते शिरले. त्या दुकानात संजय उर्फ नंदू मैती व चार कामगार काम करत बसले असता त्याना बंदूक व काेयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील साेने हिसकावून घेतले. दाेघे बाहेर येऊन दुकानाचे शटर बाहेरून बंद केले. त्यानंतर त्या चाेरांनी दुसर्‍या दुकानात प्रवेश करून तेथील कामगार मृत्युंजय जयंता मैती व तीन कामगारांनाही धाक दाखवून साेने हिसकावून घेतले. तेथून पलायन करून ते दुचाकीवरून पसार झाले.
ही घटना समताच पाेलीस अधीक्षक समीर शेख, पाेलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, पाेलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, भुईंजचे पाेलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पाेलीस निरीक्षक अमाेल गवळी यांनी घटना स्थळाला भेट दिली. घटनास्थाची फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू हाेते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.