मुंबई हादरली! चेहऱ्यावर वार, प्रायव्हेट पार्टमध्ये.....
मुंबई : नवी मुंबई येथे घडलेल्या एका घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. या प्रकरणी तिच्या वडिलांनी उरण पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत एक मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्री शिंदे हिचा असल्याचे उघड झाले. शवविच्छेदन करतेवेळी पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. यशश्रीचा प्रायव्हेट पार्टवर वार करण्यात आले होते. शरिरावरही अनेक जखमा आढळल्या. यशश्रीची हत्या इतर कोणी नसून दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केली होती. दाऊद शेखने वयाच्या 14व्या वर्षी यशश्रीवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यावेळी त्याला पॉक्सो प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता.
नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की, मृत यशश्री शिंदे वाणिज्य शाखेची पदवीधर असून, तिने एका खासगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी ती तिच्या मित्राच्या घरी जात असल्याचे पालकांना सांगून घरातून बाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली.
कुत्रे लचके तोडत होते
शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्यातील तपास शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला कोटनाका येथील रस्त्यावर एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असून भटके कुत्रे तिचे लचके तोडत असल्याची माहिती दिली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने मुलीचा चेहरा विद्रूप झाल्याचे पोलीस पथकाला आढळून आले, तसेच तिच्या खांद्यावरचे मांसही खाल्ले होते. कमरेला आणि पाठीवर चाकूच्या तीन जखमा होत्या.
कशी पटली मृतदेहाची ओळख
पोलिसांनी सांगितले की, बेवारस मृतदेह मिळाल्यानंतर यशश्री शिंदेच्या पालकांना बोलवण्यात आले. त्यांनी तिच्या कपड्यांवरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटवली. त्याचवेळी पीडित मुलीच्या पालकांनी दाऊद शेख नावाच्या संशयिताचे नाव सांगितले.
वयाच्या 14व्या वर्षी यशश्रीला पहिल्यांदा टार्गेट केलं
व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखने 2018 मध्ये 14 वर्षीय यशश्री शिंदेला टार्गेट केलं. तिला गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं. 2019 मध्ये त्याने यशश्रीचे शारीरिक शोषण केले. कुटुंबीयांनी दाऊदविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दाऊदला तुरुंगात पाठवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊदने पुन्हा यशश्रीशी संपर्क साधून तिचा पाठलाग सुरू केला.
अपहरण आणि खून!
दाऊदने गुरुवारी यशश्रीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यावरही दाऊदचे समाधान झाले नाही, म्हणून त्याने यशश्रीचा प्रायव्हेट पार्ट दगडाने ठेचला. कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडावे म्हणून मृतदेह झुडपाजवळील कचराकुंडीत फेकून दिला. यशश्रीच्या डोक्यावरील केसही कापलेले आढळले. आरोपी हा कर्नाटकचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा पत्ता लागला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.