सांगली 27 जुलै 2024:- सांगली मिरज कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षास आज मा.आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी भेट देऊन महापालिकेने पूर परिस्थितीबाबत केलेले उपयायोजन व पूर परिस्थितीत केलेले नियोजन या बाबत माहिती घेतली.
यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती यावेळी दिली आहे . महापालिकेच्या कामकाजाबद्दल मा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या चांगल्या प्रकारे काम करत असून पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासनांशी समन्वय साधून संभाव्य आपत्ती वर आपण नक्की मात करू असे यावेळी बोलताना सांगितले आहे. यावेळी माजी सभापती धीरज सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळे व नकुल जकाते आदी महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.