Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत ':त्या ' कागदपत्रामुळे भांडाफोड

पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत ':त्या ' कागदपत्रामुळे भांडाफोड 


पुण्यामधील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या नव्या माहितीमुळे, पूजा यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी तिने कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे संकेत या नव्या माहितीमधून मिळत आहेत. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पूजा यांनी दिलेलं आधार कार्ड आणि रेशन कार्डमधील माहितीत तफावत आढळून आली आहे.

आधार आणि रेशनकार्डमध्येही घोळ
पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून (व्हायसीएम) देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणावरुन वाद सुरु असतानाच आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी देलेल्या कागदपत्रांमध्येच घोळ असल्याचं समोर येत आहे. या प्रमाणपत्रासाठी वास्तव्याचा पुरावा म्हणून पूजा यांनी सादर केलेल्या आधार कार्डवर आणि रेशन कार्डवरील पत्ता वेगवेगळा असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळेच अशी तफावत असताना दिव्यांग प्रमाणपत्र कसं देण्यात आलं असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
कशावर कोणता पत्ता?

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व्हायसीएम रुग्णालयात दिलेलं आधार कार्ड समोर आलं आहे. पूजा या 7 टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र व्हायसीएम रुग्णालयाने दिलं होतं. आधी पूजा यांनी रहिवाशी पुरावा म्हणून केवळ रेशन कार्ड दिल्याचंच सांगण्यात येत होतं. मात्र, रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचं म्हटलं होतं. आता पूजा यांचं हे आधार कार्ड समोर आलं आहे. मात्र या दोन्ही ओळखपत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे. आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध येथील पत्ता दिला आहे. तर रेशन कार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिलेला आहे. त्यामुळं दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र हे खरंच नियमाला धरून देण्यात आलंय का? डॉक्टरांना दिलेली क्लीन चीट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दोन वेगवगेळ्या कागदपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते असताना अर्ज पात्र कसा ठरला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

रुग्णालयाने क्लीन चीट देताना काय म्हटलेलं?
पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कुणीही दोषी नसल्याचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमध्ये कोणीही दोषी नसल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं. अर्ज दाखल करताना सादर केलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या विभागाची नसल्याचे ही रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी डॉक्टरांना क्लीन चीट दिल्यानंतर म्हटलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.