सोलापूर :-अंत्यसंस्कार उरकून घ्या, बेवारस म्हणून नोंद करा, मयत झालेल्या वडिलांसाठी मुलाचा निरोप
सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात काळीज फटणारी दुर्दैवी घटना घडली आहे. शहरानजीक असलेल्या मोरवंची (ता. मोहोळ) येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका ७६ वर्षीय वृद्धाचे निधन झाले होते.
याबाबतची माहिती कुटुंबीयाना कळविण्यात आली. परंतु, पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार दिला. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. बाप म्हणायला लाज वाटते, असे सांगून मुलाने पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच बेवारस आहे, अशी नोंद करा, असा निरोप वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्था चालकांकडे त्याने दिला. तसेच अंत्यदर्शनासाठी येण्यासही मुलाने नकार दिला. यामुळे संस्थेनेच पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यामुळे मुलांची मानसिकता कशी झाली आहे, याचा अंदाज आपल्याला येईल.याबाबत मुलगा म्हणाला की, त्यांना कोणीही नाही असा सांगा आणि बेवारस म्हणून नोंद करा, तसेच अंत्यसंस्कार उरका असेही ते म्हणाले. वृध्दाश्रमात मयत झालेल्या वृद्धाच्या मुलाने पित्याचे शेवटचे तोंडही पाहिले नाही. मृत वृद्ध आजोबा मोरवंचीत प्रार्थना फाउंडेशनमार्फत मोफत चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते.त्यांच्या मागे दोन मुलं आणि वृद्ध पत्नी असा परिवार आहे. परंतु कौटुंबिक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी राहायला आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, अंत्यसंस्कार झालेले आजोबा हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे होते. हयात असताना ते मिळेल ते काम करायचे. अनेक वर्षापासून त्यांचा कुंटुंबाशी फारसा संबंध नव्हता, कधी-कधी ते घरी पैस नेऊन द्यायचे, अशी माहिती समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.