जैन समाजासाठी रावसाहेब पाटील यांचे योगदान मोलाचे
सांगली: दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष (स्व.) रावसाहेब पाटील यांनी कार्यकर्तृत्वाने जैन समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली. जैन समाजासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचाराने मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले.
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. भालचंद्र पाटील म्हणाले, दादांचे अकाली निधन हा जैन समाजासाठी मोठा मानसिक धक्का आहे. दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व कुशल समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयी मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. चेअरमन रावसाहेब जि. पाटील म्हणाले, सांगलीतील द.भा.जैन सभेचे ऐतिहासिक शताद्वी त्रैवार्षिक अधिवेशन हे दादांमुळे शक्य झाले.
दत्ता डोर्ले म्हणाले, जैन समाजाला एकसंघ ठेवणारा दुवा म्हणजे दादा होते. खजिनदार संजय शेटे म्हणाले, दादांच्या रूपाने एक कणखर नेतृत्व लाभले. सहखजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले, छत्तीस वर्षापूर्वी वीराचार्यांच्या आकस्मात जाण्याने समाज सैरभैर झाला होता. डॉ. विजयकुमार सकळे म्हणाले, दादा हे फक्त जैन समाजाचे नव्हते तर बहुजनांशीही त्यांची घट्ट नाळ जोडली गेली होती. गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेच्यावतीने ऋतुराज पाटील, महामंत्री दादासाहेब पाटील- चिंचवाडकर, राजेंद्र झेले, महिला महामंत्री कमल मिणचे, पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा. ए. ए. मुडलगी, सेक्रेटरी प्रा. आप्पासाहेब मासुले, वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बी. बी. हुपरे, डॉ. कुबेर शेडबाळे, अनिता पाटील, जैन बोर्डिंगचे चेअरमन Eligi प्रा. राहुल चौगुले, डॉ. चंद्रकांत चौगुले, डॉ. अशोक नाईक, डॉ. जयपाल चौगुले, श्रीपाल चौगुले यांनी श्रध्दांजली वाहिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.