Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत हिपॅटायटीस दिन साजरा

राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत हिपॅटायटीस दिन साजरा
 

सांगली :  राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील ३५ जिल्हयांमध्ये २८ जुलै २०१९ पासून सुरु करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय या ठिकाणी ४ Model Treatment Center (MTC) व ३२ Tretment center (TC) यांची उभारणी करण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली यांचे अधिनस्त राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्राम हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविला जात आहे. या कार्यक्रमाकरिता स्वतंत्र वैद्यकिय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता यांची नियुक्ती करणेत आली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत हिपॅटायटीस बी आणि सी रुग्णांची तपासणी आणि उपचार देवून हिपॅटायटीस चा प्रादुर्भाव रोखणेकरिता निदान व संदर्भित रुग्णांना उपचार व औषधोपचार तसेच लसीकरण केले जाते. हिपॅटायटीस बी संदर्भित मातेच्या बालकांना Hep. B Immunoglobin Inj उपलब्ध करुन दिली जाते. आजअखेर सांगली जिल्ह्यांतर्गत सदर कार्यक्रमामधून सन २०१९ पासून आजअखेर ५२००० इतक्या संशयित रुग्णांच्या मोफत तपासण्या व पॉझिटिव्ह २६ रुग्णांवर मोफत उपचार करणेत येत आहेत. आजअखेर हिपॅटायटीस सी चे एकूण ५ रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झालेले आहेत.

राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत दि.२९ जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या जनजागृती करिता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली येथून राम मंदिर चौक व पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली या मार्गावरुन जनजागृती फेरीचे आयोजन करणेत आले होते.
सदर कार्यक्रमाकरिता शासकिय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, अधिक्षक डॉ. देवकारे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. स्मिता गवळी, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया पाटील, कार्यक्रम प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी, वित्त अधिकारी महेंद्र खोत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेकरिता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अधिनस्त अनिरुध्द लोंढे, पुनम पाटील, सुमित उपाध्ये, अभिजीत पाटील, निकेत वंजाळे यांचे सहाकार्य लाभले. सहाकार्य लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.