आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मंगलधाम येथे संभाव्य पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी मा जिल्हाधिकारी डॉ ,राजा दयानिधी ,मा आयुक्त शुभम गुप्ता , मा. आमदार डॉ विश्वजीत कदम , मा.जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष श्रीमंती जयश्रीताई पाटील युवा नेते जितेश भाई कदम ,वीरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूर परिस्थिती आणि प्रशासनाने केलेली उपाययोजना बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली,
मा जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी माहिती देऊन पूर बाधित नागरिकांनी घाबरून जाऊ नये ,प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून एन डी आर एफ ,भारतीय सेना व मनपा अग्निशमन दल यांच्या माध्यमातून पूर बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे, पूर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनेचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.मनपा क्षेत्रात पूर बाधित नागरिकांना स्थलांतर करून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती या वेळी मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिली आहे.मनपा प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी कर्मचारी पूर बाधित क्षेत्रात कार्यरत आहेत, या वेळी जेष्ठ माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी, संतोष पाटील माजी महापौर मेनुद्दीन बागवान , माजी नगरसेवक विष्णूं माने , संजयबापूमेढे, प्रशांत पाटील , मंगेश चव्हाण , प्रमोद सूर्यवंशी अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते या अति आयुक्त रविकांत अडसूळ, सहा आयुक्त नकुल जकाते वेळी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.