लक्ष्मीनगर परिसरातील अजिंक्यनगर येथील प्रमुख रस्त्याबाबत मनसे पदाधिकाऱ्यानी जोरदार आंदोलन केले
आज लक्ष्मीनगर परिसरातील अजिंक्यनगर मॉडर्न शाळेकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. सदर ठिकाणी ड्रेनेजच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर ठेकेदाराने योग्यरीत्या मुरुमीकरण केले नसल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे व रस्ता खचला आहे. त्यामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थांना तसेच तेथील रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचे या भागाकडे लक्ष नाही येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत रस्त्याच्या बाजूचे पथदिवे देखील लावण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी मनसेचे संजय खोत व कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन महापालिका प्रशासन व सांगलीचे आमदार यांच्या निःशेदार्थ रस्त्यावरच बसून ठेय्या आंदोलन केले जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व जोपर्यंत रस्याचे मुरुमिकरणाचे काम चालू होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा घेतल्यावर तातडीने संबंधित अधिकारी व ठेकेदार आंदोलनस्थळी उपस्थित राहिले आणि रास्ता मुरुमीकरनाचे काम चालू केले.
यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष संजय खोत म्हणाले मागील चार महिन्यांपूर्वी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ या भागाची पाहणी करून, तात्काळ सर्व कामे पूर्ण करून देतो असे नागरिकांना आश्वासन देऊन गेले होते. परंतु अद्यापही कोणतीही कामे पूर्ण झाली नाहीत. सदर आमदार निष्क्रिय असून प्रशासनावर त्यांचा वचक नाही. केवळ ऑफिस मध्ये बसून त्यांच्या ठेकेदारांना ठेके वाटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे.यावेळी कुमार सावंत, अमित पाटील, संग्राम पाटणकर, स्वप्नील शिंदे, सागर कोळेकर, अनिकेत गायकवाड, निलेश चंदनशिवे, हेमंत गोसावी, स्वप्निल कांबळे, दिलीप रेनके, बिरू यमगर, सुरेश निकम, सचिन घोडके, सागर पाटील, ज्योती भंडारे, रोहिणी भोसले, सुनीता पाटील, पूजा भोसले उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.