छत्रपती संभाजी नगर :-आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून नेहमी खुन्नस देणाऱ्या सासरा अन् चुलत साल्याने (मेव्हना) जावयाला भररस्त्यात चाकूने भोसकलं. इंदिरानगर, गारखेडा भागात ही घटना घडली होती. दरम्यान, जखमी जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमित मुरलीधर साळुंके, असं मृताचं नाव आहे. या प्रकरणी गीताराम भास्करराव कीर्तिशाही, अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही (दोघे रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात आता खुनाचे कलम वाढण्यात आलं आहे.
दोन महिन्यांपूर्वी विवाह मुलीच्या प्रेमविवाहानंतर संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; वडील अन् मोठ्या मुलाचा मृत्यू अधिक माहितीनुसार, मुरलीधर साळुंखे हे फिर्यादी आहेत. ते पत्नी, दोन मुले आणि सुनेसह इंदिरानगर येथे राहतात. २ मे २०२४ रोजी त्यांचा मोठा मुलगा अमित यांनी गीताराम कीर्तिशाही यांच्या मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. हे लग्न पार पडल्यानंतर गीताराम कीर्तिशाही व अप्पासाहेब कीर्तिशाही यांनी मुरलीधर यांची भेट घेऊन अमित आणि त्याच्या पत्नीला इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका. जर ते येथे दिसले तर त्यांच्या जीवाचे बरेवाईट करू, अशी धमकी दिली होती. तेव्हापासून ते खुन्नस देत होते.साळुंके कुटुंबीयांनी १४ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजता जेवण केलं. त्यानंतर अमित हा पायी फिरण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर १०.४५ वाजता कीर्तिशाही चुलता-पुतण्याने अमितला गाठले. आमच्या मुलीसोबत लग्न करून उलट येथेच आमच्यासमोरच राहतो का, असं धमकावून विचारत त्यांनी अमितवर चाकूहल्ला केला होता. त्याच्या पोटात, मांडीवर आणि हातावर चाकूने वार केले होते. गंभीर जमखी अमितवर घाटीत ११ दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.