Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाडकी बहीण योजनेचा अर्ज मराठीतून भरला आहे तर होणार रद्द? शासनाच्या नव्या नियमाने महिलांची धावपळ

लाडकी बहीण योजनेचा अर्ज मराठीतून भरला आहे तर होणार रद्द? शासनाच्या नव्या नियमाने महिलांची धावपळ
 
 
 
राज्य शासनाने महिलावर्गाला खुष करण्यासाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जामध्ये रोज नवनवीन बदल शासनच करु लागल्याने महिलावर्गात या योजनेबाबतच आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलावर्गाला रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची घोषणा केली. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ते 3000 रुपये जमा केले जाईल असे आश्वासीत केल्याने राज्यभरात महिलावर्गाची या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आज ही धावपळ सुरु असल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला सदर योजनेचे जे फॉर्म शासनाने जाहिर केले त्यामध्येही शासनाने दोन वेळा बदल करुन नवीन अर्ज भरण्याचे आवाहन केले, सदरचे अर्ज भरण्यासाठी महिलावर्गाच्या लांबच लांब रांगा सेतू केंद्राबाहेर लागल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यानंतर सदरचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडे भरावे असे ही नमुद करण्यात आले, तर सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेचे आधारकार्ड अपडेट असणे व ते बँक खात्याला लिंक असणे बंधणकारक असल्याचे जाहीर करण्यात आल्याने आज ही गावोगावी बँकेच्या बाहेर व आधारकेंद्राबाहेर महिलांच्या रांगा दिसून येत आहेत. एवढे व्याप करुनही आजवर हजारो महिलांनी आपले ऑनलाइन व ऑफलाइन असे अर्ज भरले आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी या योजनेतील पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये १९ ऑगष्ट रोजी जुलै व ऑगष्ट असे दोन महिन्याचे ३ हजार रुपये पाठवले जाईल अशी पुन्हा घोषणा केल्याने उर्वरीत महिलांची सर्वत्र एकच धावपळ सुरु आहे.
अनेक महिलांनी सदरचे अर्ज हे नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा केले आहेत, तर अनेक महिलांनी स्वत: हे अर्ज ऑनलाइन भरले आहेत त्यासाठी महिलावर्गाने तासनतास वेळ घालवला आहे. अनेकदा ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर बंदची खूप मोठी अडचण येत आहे, आज ही ग्रामीण भागात तशीच परिस्थिती आहे. महिलांना या योजनेतंर्गत प्रतिमहिना दीड हजार रुपये शासन देणार आहे. अशी घोषणा झाल्याने राज्यातील प्रत्येक गावोगावी महिलावर्गाच्या बँकेबाहेर, आधार केंद्राबाहेर, सेतु केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून येत आहे. 
 
ज्या महिलांनी अर्ज ऑनलाइन भरले आहेत त्यांनी अर्ज भरला एकदाचा असे म्हणत दीर्घ श्वास सोडला असला तरी आता शासनाने भरलेल्या अर्जाची छानणी सुरु केली असून ज्या महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत ते सर्व अर्ज इंग्रजी भाषेतून भरलेत का याची तपासणी केली जात आहे. ज्या महिलांनी मराठीतून अर्ज ऑनलाइन भरले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याची नवीन माहिती समोर आली असून या नवीन समोर आलेल्या माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माणच्या प्रांताधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळी त्याचे निकष काही ठरले नव्हते, त्यानंतर त्याचे निकष ठरवण्यात आले आहेत त्यामुळे त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत, आता ही सदर भरलेल्या अर्जांची छानणी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहे त्या एजन्सीच्या सॉप्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे, मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाइन अर्ज हे इंग्रजीतुनच भरले जावे जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील.

आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण बहुतांशी महिलांनी, अंगणवाडी सेविकांनी व सेतु केंद्र चालकांनी सदरचे अर्ज हे मराठीतूनच भरले आहेत, त्यामुळे या सर्वांमध्ये एकच गोंधळ उडाला असून या सर्वांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेच्या पोर्लटमध्ये मराठी भाषेचा ऑफ्शन असल्याने हजारो महिलांनी या भाषेतूनच अर्ज भरले आहेत. शासनाला जर इंग्रजी भाषेतून अर्ज स्विकारायचे होते तर मग मराठी भाषेचा पर्याय अँपमध्ये कसा काय दिला? असा संतप्त सवाल महिलावर्गातून उपस्थित केला जात आहे. तर आजवर भरलेल्या अर्जाचे काय होणार, त्या महिला सदर योजनेसाठी पात्र होणार काय ? असाही सवाल महिला वर्ग उपस्थित करीत असुन याबाबत योग्य ती माहिती जाहीर करावी अशी मागणी समस्त महिला वर्गातुन होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.