वसतीगृहात संचालिकेच्याच मुलांचा हैदोस? मुलीवर अत्याचार करत राहिले, त्यानंतर खून केला... त्यानंतरीही....
लातूर :- महाराष्ट्राला काळिमा फासणारी एक घटना सध्या समोर आली आहे. जेथे मुली सुरक्षित राहतील असा वसतिगृहात मुलींना पालक ठेवतात. त्याच वसतिगृहाच्या संचालिकेच्याच मुलांनी काळिमा फासणारे कृत्य केल्याचा आरोप सध्या केला जातोय. लातूरमध्ये एका भागात मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात निवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर तिचे दुसऱ्यांदा सोलापूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
यात आलेल्या अहवालानुसार वसतिगृह चालविणाऱ्या संचालिका व तिच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींच्या या वसतिगृहात अनेक मुली राहतात. त्याचप्रमाणे एका मजुराच्या दोन मुली त्याच वसतिगृहात राहत होत्या.
२८ जून रोजी सकाळी वसतिगृह संचालिकेचा संबंधित मुलीच्या वडिलांचा फोन केला. त्यामध्ये तुमची मुलगी दोरीमध्ये पाय अडकून पडल्याचे सांगून, ती हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही तत्काळ या असा निरोप दिला.मुलींचे वडील हॉस्पिटलमध्ये गेले असता तुमच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांच्या मनात शंका निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच त्या मुलीने वडिलांकडे आमच्या वसतिगृहातील संचालिकेच्या नातेवाईकांकडून लैंगिक छळाची माहिती दिली होती. याबाबत वसतिगृहाच्या संचालिकीकडे तक्रार केली असता त्यांनीउडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान लातूर येथेच त्या अल्पवयीन मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले व पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंदही केली. मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्याने मुलीचे इतरत्र शवविच्छेदन इन कॅमेरा करावे, अशी मागणी केली मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्याने होती.त्यानंतर त्या मुलीचे शवविच्छेदन दुसऱ्यांदा सोलापूर येथे करण्यात आले, त्या अहवालामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे आपली बाजू मांडल्यानंतर या प्रकरणात वसतिगृह चालविणाऱ्या संचालिका व तिचे दोन मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृहात घडलेल्या या घटनेमुळे लातूर शहरातील वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर मृत मुलीची ११ वर्षांची लहान बहीण या वसतिगृहात असून तिने जबाबात म्हटल्याप्रमाणे, माझी मोठी बहीण हिला रात्री संचालिकेच्या मुलांनी बोलावून घेतले होते. तू गुपचूप झोप अशी धमकी मला दिली. माझी बहीण जायला नकार देत असताना मग त्यांनी मारहाण केली. तिला ओढत नेले व त्यानंतर ती आलीच नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.