Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' ब्लाऊज खोलून पाहा '... माता सीतेबाबत वृंदावनच्या महामंडलेश्वरांचे वादग्रस्त वक्तव्य, कारवाईची मागणी

' ब्लाऊज खोलून पाहा '... माता सीतेबाबत वृंदावनच्या महामंडलेश्वरांचे वादग्रस्त वक्तव्य, कारवाईची मागणी 


वृंदावनमधील कथावाचक महामंडलेश्‍वराने माता सीतेवर आक्षेपार्ह टिप्‍पणी केल्याने खेळबळ माजली आहे. वृंदावनच्या परिक्रमा मार्गावरील श्री राधा किशोरी धाममध्ये राहणाऱ्या महामंडलेश्‍वर इंद्रदेव महाराज यांनी रामलीलामध्ये माता सीता आणि प्रभू रामाची भूमिका करणाऱ्या कलाकारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. 
महामंडलेश्‍वर इंद्रदेव यांनी आपल्या कथा वाचनाच्या दरम्यान म्हटले की, रामलीलामध्ये जे पात्र प्रभू राम व माता सीतेची भूमिका करतात ते सिगरेट ओढतात, दारू पितात. इंद्रदेव इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही सर्वांनी पाहिले आहे, जावा ब्‍लाउज खोलून पाहा, ही साता नाही तर कुंभकर्ण आहे. 
इंद्रदेव यांच्या कथा वाचनाची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. इंद्रदेव यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी लोकांनी केली आहे. दरम्यान प्रकरण अंगलट येताना पाहून इंद्रदेव महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, त्यांनी लहानपणी जे पाहिले तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. देवाचा अपमान करण्याचा त्यांचा उदेश्य नव्हता. त्याचबरोबर लोकांच्या धार्मिक भावनेला दुखावण्याचा त्यांचा विचार नव्हता.

हिंदुत्वादी संघटना आक्रमक -
दरम्यान इंद्रदेव महाराजांनी माफी मागितल्यानंतरही धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी महामंडलेश्‍वर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. अखिल भारत हिंदू महासभेचे माजी प्रदेश उपाध्‍यक्ष पंडित संजय हरियाणा यांनी वरिष्‍ठ पोलीस अधीक्षकांना निवेदन देत इंद्रदेव यांच्याविरोधात एफआईआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

संघटनांनी म्हटले की, महाराजांनी याआधीही आपल्या पायांवर पवित्र व धार्मिक चिह्न गोंदवून धर्माच्या विरुद्ध आचरण केले आहे. आता माता सीता व प्रभू रामांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. हे माफीच्या लायक नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाऊ केली जावी.
फिगर मेंटेन करणं सोडा, ४-४ मुलं जन्माला घाला - महामंडलेश्वर प्रेमानंद

मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या बडनगर रोडवरील मोहनपुरामधील श्री बाबाधाम मंदिरात (आर्जिवले हनुमान ८१ फूट) श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी महिलांना हे सल्ले दिले. हिंदू महिलांनी आपली फिगर मेंटेन करण्याची काळजी सोडून द्यावी आणि चार-चार मुलं जन्माला घालावी,' असा सल्ला पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी दिला आहे. प्रेमानंद महाराज यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.