Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तान्हा बाळाला दुधाऐवजी पाजली Beer, करामती बापाचा Video व्हायरल

तान्हा बाळाला दुधाऐवजी पाजली Beer, करामती बापाचा Video व्हायरल
 
 

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पोटच्या मुलासोबत दारू पिण्यासाठी गेला. एवढेच नव्हेतर त्याने मुलालाही बिअर पाजली. हा प्रकार आजूबाजुच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला फटकारले. यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्याआधीच तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सदर बझार कोतवाली परिसरात असलेल्या मॉडेल शॉप कँटिन येथील असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे एका व्यक्तीने पोटच्या मुलाला बिअर पाजली. संबंधित व्यक्ती आपल्या लहान मुलांना बिअर प्यायला देत असल्याचे उपस्थित लोकांनी पाहिल्यानंतर सर्वांना त्याला विरोध केला. यानंतर कोणीतरी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. मात्र, पोलीस येण्याआधीच तो फरार झाला. तिथे उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक लोक बसून दारू पिताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये ही व्यक्तीही बसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आता मॉडेल शॉपच्या कॅन्टीनच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चर्चा आहे.

सदर बझार पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. @TaviJournalist या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'शाहजहांपूरच्या सदर बाजार कोतवाली भागात असलेल्या मॉडेल शॉप कॅन्टीनमध्ये आपल्या तान्ह्या मुलाला आपल्या मांडीवर घेऊन एक बाप दारू पिण्यासाठी पोहोचला. काही वेळाने त्याने मुलालाही बिअर देण्यास सुरुवात केली, हे पाहून उपस्थित लोकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.