विद्यार्थीसाठी मोठी बातमी! 9वी, 10 वी आणि 11 वीचे गुण आता 12 वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये....
विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात 12वीच्या निकालात 9वी, 10वी आणि 11वीचे गुण महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. NCERT च्या युनिट 'पारख' ने शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर केलाय. या अहवालात इयत्ता 9, 10 आणि 11 चे गुण इयत्ता 12वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये जोडण्याची शिफारस करण्यात आलीय. अहवालात असं नमुद करण्यात आलंय, की जर विद्यार्थी 9वी, 10, 11 च्या परीक्षांमध्ये चांगले प्रदर्शन करत असेल आणि त्याची वर्गातील उपस्थिती ही उत्तम असेल तर त्यांना 12वीच्या निकालात याचा फायदा मिळायला हवा.
12वी बोर्डासाठी कोणत्या वर्गाला किती वेटेज?
वर्ग वेटेज
9वी - 15%
10 वी - 20%
11 वी- 25%
12 वी - 40%
'परख' अहवालानुसार, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे परीक्षा रिपोर्ट कार्ड्स, गटचर्चा, प्रकल्प इत्यादींद्वारे सतत वर्गातील मूल्यांकन आणि टर्म एंड परीक्षा यांचं संयोजन असायला पाहिजे.इयत्ता 9 वी मध्ये, अंतिम गुणांपैकी 70% फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि 30% समेटिव्ह असेसमेंटमधून घेतले जातील.हे 10वी वर्गात 50-50% वेटेजवर असायला पाहिजेइयत्ता 11वी साठी हे प्रमाण अनुक्रमे 40% आणि 60% असायला पाहिजे.इयत्ता 12 वी मध्ये, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे वेटेज 30% पर्यंत कमी केले जाईल आणि 70% अंतिम मार्क्स समेटिव्ह असेसमेंटवर देण्यात येतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.