Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनांमुळे विध्ससं :, ढिगाऱ्या खाली दबून 50 पेक्षा जास्त जणांनी गमवला जीव

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनांमुळे विध्ससं :, ढिगाऱ्या खाली दबून 50 पेक्षा जास्त जणांनी गमवला जीव 
 

वायनाड : केरळच्या वायनाडमधील काही गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. या भस्खलनात शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. एनडीआरएफ आणि एअरफोर्सचं पथक घटनास्थळी मदतकार्याला पोहोचली आहे. वायनाड जिल्ह्याच्या मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावात ही दुर्घटना घडली आहे. 

केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यात आपात्कालीन स्थितीत आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच दोन हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. 8086010833 आणि 9656938689 हे दोन्ही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील वैथिरी, कलपट्टा, मेप्पडी आणि मननथावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. 

वायनाडमधील चार गावांत झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तैनात करण्यात आलं आहे. १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमध्ये भूस्खलनामुळे जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच या घटनेतील जखमींना ५० रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

घटनास्थळी सैन्य दल तैनात

या भीषण दुर्घटनेनंतर सैन दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. १२२ इन्फँट्री बटालियनच्या दोन तुकड्या आणि कन्नूरच्या डीएससी सेंटरच्या २ तुकड्यांचा समावेश आहे. मदतकार्यात मोठ्या संख्येने सैन्य दलातील जवान मदतीला धावले आहेत. मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भूस्खलनाची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय आरोग्य मिशनने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांकही जारीर केले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.