लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला . दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरल आहे. त्यातच आज रविवार असल्याने पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. आप्ताकालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनस्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असून, त्यांचं शोधकार्य सुरू आहे.लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर लवकर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता लोणावळ्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने भुशी धरणही लवकरचं भरण्याची अपेक्षा आहे.
माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवली
पुण्यातील माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवलीये. त्यामुळे विकेंडला येणा-या पर्यटकांचा हिरमोड झालाय. जून महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊसच नसल्यानं धबधबे प्रवाहित झाले नाहीये. याचा याठिकाणच्या व्यावसायिकांना फटका बसलाय. पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं व्यावसायिक अडचणीत आलेत.
पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार
राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय.. हवामान खात्याकडून आज पुणे ,सातारा सह संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.. तर आज आणि उद्या पुणे शहरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.