Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अलमट्टीतून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग

अलमट्टीतून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग 


कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून  आज शनिवारी (दि. २७ जुलै) दुपारी १२ वाजता ३ लाख क्युसेक इतका विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरण येथून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या ३ तासांपासून धरणातून सुरासरी ३ लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट ४ इंचावर, ९८ बंधारे पाण्याखाली

दरम्यान, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असला तरी कोल्हापुरातील महापुराची  धास्ती  कमी झालेली नाही. शहरात कालपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कोल्हापुरात आज शनिवारी दुपारी १२ वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४७ फूट ४ इंच इतकी होती. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ९८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

अलमट्टी धरण हे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर होतो, त्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्गाकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष असते. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय ठेवा, मुख्यमंत्र्यांची सूचना

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. सेन्यदलाची मदत घ्यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.