Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

124 वर्ष जुन्या घरातील कार्पेट उचललं; त्याखाली दिसलं असं काही की कपल शॉक

124 वर्ष जुन्या घरातील कार्पेट उचललं; त्याखाली दिसलं असं काही की कपल शॉक

मुंबई : बहुतेक जुन्या घरांमध्ये पूर्वी लोक गुप्त खोल्या आणि कपाट बांधत असत. चोरी, दरोड्यापासून घर सुरक्षित ठेवणं हा यामागचा हेतू असायचा. या गुप्त ठिकाणी लोक आपल्या मौल्यवान वस्तू लपवून ठेवत असत. त्या दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या घरातील ते रहस्य कायमचं दफन होऊन जायचं. अशाच एका घराची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण युनायटेड किंगडममधील आहे, जिथे एका रहिवाशाने आपलं शेकडो वर्षे जुनं घर विकलं.

कदाचित त्याला त्याच्या घराचं रहस्य माहित नव्हतं. ज्याच्या आत 'दुसऱ्या जगात' जाण्याचा मार्ग होता. हे घर खूपच जीर्ण असल्यानं नूतनीकरणादरम्यान खरेदीदाराला गुप्त खोली दिसली. यूकेमधील हे घर 124 वर्षांपूर्वी बांधण्यात आलं होतं. वर्षानुवर्षे घरची परिस्थिती बिकट होत गेली. कुटुंबातील सदस्यांना वडिलोपार्जित वारसा सांभाळणं शक्य नव्हतं. घराच्या लाकडाला कीड लागल्यामुळे घरही कोसळण्याच्या मार्गावर होतं. अशा परिस्थितीत, बेन मन आणि त्यांची पत्नी किम्बर्ले यांनी हे घर 2020 मध्ये विकत घेतलं. घराची परिस्थिती फारच वाईट होती.

अशा स्थितीत नवीन घरमालकांनी त्यांच्या घराची दुरुस्ती सुरू केली. यावेळी, बेडरूममध्ये असलेलं कार्पेट साफ करण्यासाठी त्यांनी उचलले तेव्हा एक रहस्य उघड झालं, जे त्यांना माहित नव्हतं. क्षणभर त्यांचं भान हरपलं. या कार्पेटच्या खालची फरशी लाकडाची होती जी तुटलेली होती. जेव्हा त्यांनी ती उचलली तेव्हा त्यांना खाली एक जिना दिसला, दोघांनाही तो कुठे जातो याची कल्पना नव्हती.

हिंमत करून 39 वर्षांच्या बेनने पायऱ्या उतरण्याचा निर्णय घेतला. पण तिथे पोहोचताच त्यांना या गुप्त खोलीत एक वेगळंच जग दिसलं. एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना बेनने सांगितलं की, जर फरशीचं लाकूड सडलं नसतं तर कदाचित या गुप्त खोलीकडे त्यांचं लक्ष कधीच गेलं नसतं. लाकूड कुजलेलं होतं आणि त्याची दुर्गंधी येत असल्याने त्याचं नूतनीकरण करण्यात येत होतं. हे रहस्य उघड झाल्यानंतर या जोडप्याने या भागाचं पूर्णपणे नूतनीकरण केलं आहे.

घराखालच्या या गुप्त खोलीला या जोडप्याने नवा लूक दिला आहे. या जोडप्याने तिथे एक बार बनवला आहे, ज्यामध्ये सोफा आणि प्रोजेक्टर आहे. जोडप्याने त्याचं नाव मन गुफा ठेवलं आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु या जोडप्यानं त्यांच्या घराचं संपूर्ण नूतनीकरण स्वतः केलं आहे, ज्यामुळे रिनोवेट करण्याचा खर्चही वाचला. मात्र, अनेकांना या 'दुसऱ्या जगा'बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.