Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 हजारांची लाच घेतांना मुख्या ध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात :, शिक्षण क्षेत्रात खळबळ

10 हजारांची लाच घेतांना मुख्या ध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात :, शिक्षण क्षेत्रात खळबळ 


लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जळगाव एलसीबीच्या जाळयात अडकला आहे. संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. नेपाने ता. एरंडोल) असं लाचखोर मुख्याध्यापकाचं नाव असून या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
या संदर्भात अधिक माहिती, एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर हायस्कूलमध्ये 33 वर्षीय तक्रारदार शिपाई हे शिपाई म्हणून पदावर नोकरीला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक त्यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर करून देतो असे सांगून याच शाळेत मुख्याध्यापक असणारे संदीप महाजन यांनी मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली.

दरम्यान तडजोडी यांची १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरुवारी २७ जून रोजी दुपारी सापळा १० हजाराची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक संदीप महाजन यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केला सापळा यशस्वी जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे आदींनी हा सापळा यशस्वी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.