दिल्ली : आपल्या शरीराला थोडासाही चटका जरी लागला तरी आपल्याला त्रास होतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा तरुणीची कहाणी सांगणार आहोत, जिला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून संकटांचा सामना करावा लागला. मात्र, तरीही ती खचली नाही आणि परिस्थितीची लढत राहिली.
जूली असे या मुलीचे नाव आहे. ती 14 वर्षांची असून उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथील रहिवासी आहे. जूलीने लोकल18 शी बोलताना सांगितलं की, 2014 मध्ये जेव्हा ती फक्त तीन वर्षांची होती, त्यावेळी तिच्या वडिलांनी तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. आईने दुसरे लग्न केले. त्यामुळे आई वडिलांमध्ये जोरदार वाद झाला आणि वडिलांनी आईच्या कृत्याचा बदला घेण्यासाठी माझ्यावर अॅसिड हल्ला केला.
जूलीने लोकल18 शी बोलताना पुढे सांगितले की, आई वडील कधीच तिला भेटायला येत नाहीत. तसेच तिच्याशी संवादही करत नाहीत. जूली आपले आयुष्य एकटेच जगत आहे. अॅसिड हल्ल्याच्या कारणाने डोळ्याळा त्रास झाला आहे. मात्र, आजही ती खचली नसून हिमतीने आयुष्य जगत आहे.
गावातील लोक टोमणे मारायचे -
जेव्हा हा हल्ला तिच्यावर झाला तेव्हा मला काहीच कळत नव्हते. मात्र, जसजशी मी मोठी झाली, तेव्हा गावातील लोक मला टोमणे मारू लागले की मला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. तु मरून जा. मात्र, जूलीने या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता आपले आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. शीरोज होमचे मालक आलोक सर यांच्यासोबत तिने नवीन आयुष्याची सुरुवात केली, असे ती म्हणाली.जेव्हा माझ्यावर अॅसिड हल्ला झाला होता तेव्हा मला कानपूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा शीरोज होमचे मालक आलोक सर यांनी माझी मदत केली आणि लखनऊ येथील एका रुग्णालयात दाखल करुन ऑपरेशन करवून घेतले आणि तीन वर्ष आपल्या घरी ठेवले, अशी माहितीही तिने दिली. अजून ती नोकरी करत नाही. तिच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च शीरोज होमकडून केला जातो. तसेच हँडीक्राफ्ट, कॉम्प्युटर आणि इंग्रजी कोचिंग क्लासेसही तिला दिले जातात, असे तिने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.