डॉ.अदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेवून आपले जीवन संपवले
मुंबई : नीट पीजी परीक्षेचा टॉप असलेल्या आणि केईएममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत: ला इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्यनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिवडीतील टीबी रुग्णालयात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
आदित्यनाथ पाटील (मूळ रा. जळगाव) हा केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर होता. मेडिसिन विभागात प्रथम वर्षाचे पदव्युत्तरचा विद्यार्थी होता. त्याचे वडीलही डॉक्टर आहेत. केईएम रुग्णालयातील औषध विभागाचे काम सुरू आहे. त्यामुळे एक युनिट तात्पुरते शिवडी टीबी रुग्णालयात पाठवण्यात येते. डॉक्टरांची ड्युटी तिथे क्रमाने लावली जाते. डॉ.आदिनाथ याचीही ड्युटी लावण्यात आली होती.आदित्य रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याने स्वत:ला इंजेक्शन दिले आणि आयुष्य संपवले. मात्र, त्याने असे करण्याआधी कोणतीही सुसाईड नोट किंवा इतर कोणत्या गोष्टी मागे ठेवल्या नाहीत. ज्यामुळे त्याने असे का केले याचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
एक सहकाऱ्याने सांगितले की, आदित्य नीट पीजी परीक्षेत टॉप पाचमध्ये आला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो अस्वस्थ होता. त्याला डिप्रेशनचा त्रास जाणवायला लागला होता. तो डिप्रेशनमध्ये आहे. याबाबत त्याने घरी कोणतीही माहिती दिली नव्हती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.