Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फ्लॉवरमधील अळ्या झटक्यात बाहेर, ही सोपी पद्धत करून पहा

फ्लॉवरमधील अळ्या झटक्यात बाहेर, ही सोपी पद्धत करून पहा 


पावसाळ्यात भाज्यांमध्ये अळ्या दिसून येतात. अशात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये हे समजत नाही. फ्लॉवरमधील अळ्या शोधणे ही खूप कठीण गोष्ट आहे. जर तुम्हालाही फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर तुम्ही ही सोपी ट्रीक वापरू शकता. फ्लॉवरमध्ये अनेकदा अळ्या लपलेल्या असतात. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरही अळ्या बाहेर येत नाही; अशा वेळी ही सोपी ट्रीक फायदेशीर ठरू शकते.

फ्लॉवरमधील अळ्या काढा अशा झटक्यात बाहेर

फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर आधी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करा, यामुळे अळ्या सहज बाहेर पडू शकतात. एका भांड्यामध्ये मीठ टाका आणि त्यात १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. डिहायड्रेशनमुळे सर्व अळ्या झटक्यात बाहेर पडतील. त्यानंतर तुम्ही फ्लॉवर स्वच्छ पाण्याने धुवून वापरू शकता. याशिवाय तुम्ही कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. यामुळे फ्लॉवरमध्ये अळ्या असतील तर त्या बाहेर पडू शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.