सिटी सव्हेर्चा कारभार सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार - अशोकराव मासाळे
मासाळे म्हणाले, टिंबर एरियात असलेल्या माझ्या मालकीची सामाईक मिळकतीमध्ये तुकडेजोड, तुकडेबंदी कायद्याची बाधा येते. या मिळकतीसंदभार्त फेब्रुवारी २०२२ मध्ये सिटी सव्हेर् कायार्लयात तक्रार अजर् दिली होता. या मिळकतीबाबतचा दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र तेथील अधिकारी ज्योती पाटील तसेच तत्कालीन वरीष्ठ लिपीक सुनील पाटील यांनी आथिर्क तडजोड करून मिळकतीची बेकायदेशीरपणे नोंद घातली आहे असाही आरोप मासाळे यांनी केला आहे.
सांगलीतील सिटी सव्हेर् कायार्लयात एजंटांची संख्या वाढली आहे. तेथील अधिकारी, कमर्चारी वेळेवर कायार्लयात येत नाही. तसेच जे तेथे उपस्थित असतात ते नेहमीच सव्हर्र डाऊन असल्याची कारणे सांगतात. सामान्य नागरिकांची पिळवणूक केली जाते. अधिकाऱ्यांशी संगनमत करून एजंट नागरिकांची आथिर्क लूट सुरू आहे. वारसनोंदी, हक्कसोडपत्र याची कामे करताना टाळाटाळ केली जात आहे. नागरिकांनी दिलेली कागदपत्रे गहाळ केली जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सवर् बाबींची दखल घेऊन अधिकारी ज्योती पाटील, तत्कालीन लिपीक सुनील पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही मासाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.