दारू पिण्यावरून भाडंण; भाच्याने मामाला पाठविले यमसदनी
पुण्यातील कोंढवा परिसरात दारू पिण्यावरून भांडण झाल्याने मामा अन् भाच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर भाच्याने रागाच्या भरात मामाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पिसोळी येथील हनुमान नगर परिसरात 25 जुलै रोजी घडली होती.
आनंद काळंगिरे (वय 45) असे मृत्युमुखी पडलेल्या मामाचे नाव आहे. तर सचिन राम यनलवाड (वय 25) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत आनंद काळगिरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आनंद काळगिरी आणि सचिन यांना वाढ या दोघा मामा-भाच्यांमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून भांडण कोडंवा येथे झाले होते. त्यानंतर सचिन यांनी रागाच्या भरात लोखंडी रॉडने मामाच्या डोक्यात मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आनंद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.