राहुल गांधी लालू प्रसाद यादव यांच्या भेटीला
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. राहुल गांधी आणि लालू यादव यांच्या या भेटीत विविध राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडीचे इतरही नेते यावेळी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्याकडून सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. भारताच्या भविष्यासाठी देशात प्रेम आणि बंधुत्व टिकून राहणं गरजेचं आहे. त्यासाठी INDIA ही आमची आघाडी तयार आहे, असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.