डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्य पदी डॉ. किरण वाडकर
तिर्थकर एजुकेशन सोसायटीच्या डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज सांगली या कॉलेजच्या नूतन प्राचार्य पदी डॉ. किरण वाडकर यांची निवड झाली. १ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांचा प्राचार्य पदग्रहण समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला.
डॉ, किरण वाडकर यांची प्राचार्य पदी नेमणूक करून त्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. किरण वाडकर यांनी महाविद्यालयाच्या चौफेर प्रगतीसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात संस्थेच्या महावीर स्टेट अकॅडमी या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ निर्मला मोटे मॅडम यांचा डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम शिक्षा सर्वोच्च सन्मान 2023 ने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सेक्रेटरी श्री अजित प्रसाद पाटील यांनी केला.
या पदग्रहण समारंभात प्राचार्य डीडी चौगुले सर यांनी आपल्या मनोगतातून औषध संशोधनाची गरज व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडावे असे आवाहन केले आणि महाविद्यालयाच्या यशोगाथेचे वर्णन केले.
या पदग्रहण समारंभास संस्थापक प्राचार्य डीडी चौगुले, तिर्थकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील सेक्रेटरी श्री अजित प्रसाद पाटील उपाध्यक्ष श्री पोपटलाल डोरले व सर्व संचालक संस्थेचे सर्व प्राध्यापक. शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.