"स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय ? , तुमची ओकात तपासा, " बच्चू कडू यांचा भिंडेवर प्रहार
अमरावती: श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात संतापाची लाट आहे. यावर भाजपा सोडून सर्वंच पक्षांनी भिडेंच निषेध करत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, भिंडेवर टिका केली म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तर भिडेंविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात आहे. दरम्यान, भिडेवर माजी मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय?
भिडेंच्या वक्तव्यावर कडूंनी संताप व्यक्त केला आहे. "भिडेंनी आपली औकात तपासली पाहिजे, असं कडू म्हणालेत. स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय आहे? भिडेजी त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले असतील. त्यांनी एखादी लाठी स्वातंत्र्यासाठी खाल्लेली नाही. पण महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत", अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन ही विधानं केली जात आहेत. हे चुकीचं आहे. या देशात फक्त महात्मा गांधीच नाही, वीर सावरकरांबद्दलही बोललं जातं. राहुल गांधींनी मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विधानं केली. आता यांनी महात्मा गांधींबाबत विधानं केली", असं बच्चू कडू म्हणत भिडेंवर घणाघाती टिका केलीय.
भिडे काय म्हणाले.
भिडे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळं त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले", असं संभाजी भिडे अमरावतीच्या बडनेरामध्ये एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.