सांगलीतील गूळ व्यापाऱ्यालासव्वा आठ लाखांचा गंडा; गुजरातमधील चौघांवर गुन्हा
सांगली ः शहरातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्याकडून गुळ खरेदी करून त्याची रक्कम न देता व्यापाऱ्याला सव्वा आठ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी गुजरातमधील चौघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित्राबेन विराभाई पटेल, देवांग कुमार पटेल, मितलकुमार महेंद्रभाई पटेल आणि शैलेशकुमार गंगारामभाई पटेल (सर्व रा. उंझा, गुतरात) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवि आत्माराम पटेल (रा. मार्केट यार्ड, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.२०१२ ते २ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. रवि पटेल यांचे मार्केट यार्डात जक्स्नी ट्रेडर्स नावाने दुकान आहे. संशयितांनी पटेल यांच्याशी संपर्क साधून गुळ खरेदी केला होता. यात पटेल यांचा विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या गुळाची उधारी देण्यास ते टाळाटाळ करत होते. पटेल यांनी उधारीचे आठ लाख २४ हजार १९९ रुपये मिळावेत यासाठी पाठपुरावा करूनही न मिळाल्याने अखेर त्यांनी फिर्याद दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.