डेंग्यू ठरतोय घातक; टाईप-2 स्ट्रेनचे केसेस वाढताहेत, वेळीच द्या लक्ष
नवी दिल्ली : डेंग्यूमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. राजधानी दिल्लीतही सध्या डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची नोंद होत आहे. संशोधकांनी सांगितले की, येथे डेंग्यूच्या टाईप-2 स्ट्रेनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असू शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, डेंग्यू काळाबरोबर अधिक धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर आजारांचा धोकाही वाढत आहे.
तसेच जागतिक स्तरावर वाढत्या तापमानामुळे डेंग्यूचा विषाणू अधिक धोकादायक बनत आहे. म्हणजेच आताच्या तुलनेत येत्या काही वर्षांत डेंग्यूमुळे गंभीर आजार होण्याची अधिक प्रकरणे दिसून येतील. वातावरणातील बदलामुळे अनेक प्रकारचे आरोग्य धोके वाढतात. वाढत्या तापमानाचा परिणाम दरवर्षी 39 कोटींपेक्षा अधिक लोक डेंग्यूला बळी पडत आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम विषाणूवर होत असल्याचे दिसून येते. हा पहिलाच अभ्यास आहे ज्यामध्ये लोकांना तापमान आणि डेंग्यूच्या तीव्रतेबद्दल इशारा देण्यात आला आहे.
संशोधकांनी सांगितले की, वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे मोसमात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यापैकीच एक आहे, असेही त्यांनी सांगितले. केरळस्थित राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. शास्त्रज्ञांच्या टीमला प्राणी मॉडेलच्या अभ्यासात आढळून आले की, डेंग्यू अधिक गंभीर आणि धोकादायक असू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.