अरेच्चा, जन्मत:च बाळाला 2 दात; डॉ.म्हणाले......
4 ऑगस्ट : बाळाच्या जन्मानंतर त्याच्या वाढीचे विविध टप्पे आईसाठी सुखद असतात. त्यातून आई नवनवीन गोष्टी शिकत असते. बाळाचा पहिला दात येताना ते अस्वस्थ होतं, तेव्हा आईला फार काळजी वाटते. साधारणपणे बाळ जेव्हा 4 ते 7 महिन्यांचं होतं तेव्हा त्याला पहिला दात येण्यास सुरुवात होते. परंतु बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील आरडीजेएम मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवारी जन्मलेल्या एका बाळाला जन्मतःच दोन दात आहेत.मुझफ्फरपूरच्या रेवा रोड भागातील रहिवासी प्रियंका देवी यांनी या बाळाला जन्म दिला आहे. दोन दातांसह जन्मलेल्या या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
तसेच डॉक्टरांनी बाळ आणि आई दोघंही सुखरूप असल्याचं म्हटलं आहे.शंभरीपर्यंत पाहिला नाही दवाखाना, 110 वर्षांच्या आजीबाईंच्या फिटनेसचं काय आहे रहस्य? Videoमिळालेल्या माहितीनुसार, पूर्ण 9 महिने आणि अधिकचे दोन आठवडे हे बाळ आईच्या पोटात होतं. तपासणीत डॉक्टरांना त्याच्या हृदयाचे ठोके जाणवले नाहीत म्हणून शस्त्रक्रियेद्वारे आईची प्रसूती करण्यात आली. जन्म होताच बाळाच्या तोंडात दात पाहून डॉक्टरही हैराण झाले.
कारण सर्वसामान्यतः नवजात बाळाच्या तोंडात एकही दात नसतो.हनीमूनला जाताना गायब झालेली बायको अखेर सापडली! वाचा कुठं गेली होतीदरम्यान, याबाबत डॉ. कुमार गौरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जन्मतःच दात असतील तर त्याचा बाळाच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. त्यामुळे हे बाळही सुदृढ आहे. 100 बाळांमागे एक किंवा दोन बाळांना जन्मतःच दात असतात. आरडीजेएम मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने प्रसूती होतात, मात्र अशा केसेस फार कमी पाहायला मिळतात', असं ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.