Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! भिडेचं वादग्रस्त वक्तव्य; कारवाईच्या मागणीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचे फोन

धक्कादायक! भिडेचं वादग्रस्त वक्तव्य; कारवाईच्या मागणीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचे फोन 


कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचे फोन आलेले आहेत. संभाजी भिडे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यानंतर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्या मागणीनंतर त्या,ना अज्ञाताकडून त्यांना धमकीचे फोन आले आहेत. धमकीनंतर आता त्यांच्या कराडमधील निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून धमकीचा फोन आला आहे. संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

'संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपित्याबाबत अनुदार उद्‍गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट टिपणी करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने आजच बंदोबस्त करून त्यांना अटक करावी,'' अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विधानसभेत केली होती.

संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अवमानकारक विधान केले आहे. जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. भिडे हे वारंवार असे बोलून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.