Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई- दिल्ली विमानात विनयभंग! महिला डॉक्टरांच्या तक्रारीनंतर प्राध्यापकाला अटक

मुंबई- दिल्ली विमानात विनयभंग! महिला डॉक्टरांच्या तक्रारीनंतर प्राध्यापकाला अटक 


मुंबई - दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एका विमानामधील विनयभंगाचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या विमान प्रवासादरम्यान प्राध्यापकावर एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विमान टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान ही घटना घडल्याने सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 26 जुलै रोजी घडलेल्या या घटनेतील पीडित महिला 24 वर्षीय डॉक्‍टर आहे. डॉक्‍टर महिलेने आपल्या तक्रारीत, प्राध्यापक त्यांच्या शेजारच्या सीटवर बसले होते. विमान मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी आरोपीने त्यांना चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचे म्हटले आहे.

या घटनेनंतर दोन्ही प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. ही बाब क्रू मेंबर्सना कळताच त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. विमान मुंबईत उतरल्यानंतर दोघांनाही मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जिथे पीडितेच्या तक्रारीवरून प्राध्यापकाविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्राध्यापकावर कलम 354 आणि कलम 354अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला जामीन मिळाला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.