सांगलीचा पहाडी आवाज विजय दादा कडणे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार संपन्न.
सांगली जिल्ह्याला लाभलेले परिस,पहाडी,आवाजाचे लेन आणि रुबाबदार व्यक्तिमत्व व अनेक पुरस्कार प्राप्त असलेले व राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणारे सांगलीतील बुलंद आवाज माननीय विजय दादा कडणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त स्टेशन चौकामध्ये मराठा स्वराज्य संघाच्या वतीने राज्याध्यक्ष माननीय महादेवराव बापू साळुंखे व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे म्हणाले की सांगली शहरातील किंवा जिल्ह्यातील कुठलाही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी दादांची उपस्थितीत असते ही असतेच कार्यक्रमाच्या बाहेर असतानाच दादांचा आवाज ऐकून आज माननीय विजय दादा कडणेआहेतच असं वाटू लागते. या पुढील त्यांना आयुष्य भरभराटीचे सुखा समृद्धीचे व आरोग्यदायी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे मनोगत व्यक्त केले.या वेळेला राज्य प्रवक्ता माननीय संतोष पाटील म्हणाले की अनेक पुरस्कर प्राप्त असलेले यामध्ये आम्ही त्यांना स्वतः स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सांगली भूषण पुरस्कार दिला होत. सांगलीतील व राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त व दैवज्ञ समाजाचे माजी अध्यक्ष,शांतता कमिटीचे अध्यक्ष, नाट्य चित्रपट तंत्रज्ञ कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष, युवाशक्ती व्यसनमुक्ती एड्स प्रतिबंधक संस्कार केंद्राचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासन वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासन न्याय, विधी प्राधिकरणचे सदस्य, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सदस्य, अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे सदस्य, टिळक चौकातील मानाची स्वागत कमान करण्याचे प्रणेते व अध्यक्ष, व स्वर्गीय आर आर आबा यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुरस्कार स्वीकारणारे, अखिल भारतीय सुवर्णकार संघटनेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी झेलसिंग यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणारे,कुशल संघटक राजकीय सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त असलेले व त्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला ओळखणारे म्हणजेच सांगलीचा पहाडी आवाज माननीय विजय दादा कडणे यांच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त आम्ही त्यांचा स्टेशन चौकामध्ये सत्कार केला व त्यांना भविष्यकाळासाठी सुखकर समृद्धी व भरभराटीचे आयुष्य जाऊ म्हणून माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दादांना शुभेच्छा दिल्या वेळेला. मराठा स्वराज्य संघाचे शहराध्यक्ष मा. सुधीर चव्हाण,उद्योजक मा. रमाकांत घोडके, प्राध्यापक विजय कोगनळे, प्रशांत साळुंखे. चंद्रकांत गायकवाड व इतर अनेक जण उपस्थित राहून दादांना शुभेच्छा दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.